महाराष्ट्रात यंदा पावसाने (Maharashtra Rain) उशीरा हजेरी लावली. जुन महिना हा कोरडा गेल्यानंतर पावसाने जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. पंरतू त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने दडी मारली. आता सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा पावसाने पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. (हेही वाचा - Mumbai Lakes Water Level: मुंबईकरांसाठी खूशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 93.17 टक्के पाणीसाठा)
राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये शुक्रवारी तसेच शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग जिल्हांना 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असल्याचे हवामान खात्यांकडून सांगण्यात आले आहे.