Maharashtra Weather Forecast: मुंबई मध्ये शुक्रवार 29 नोव्हेंबर हा दिवस मागील 8 वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात थंड दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये काही भागात सध्या हवामान विभागाकडून ‘cold wave’ जाहीर करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री मुंबई मध्ये सर्वात कमी तापमान 16.5°C नोंदवण्यात आलं आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये सर्वात कमी तापमान 16.3 नोंदवण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रासाठी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान अधिकृतपणे 'थंडीची लाट' जाहीर करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रामध्ये विभागवार मुंबई मधील Regional Meteorological Centre कडून जारी हवामान अंदाजानुसार, नाशिकचा काही भाग, अहिल्यानगर आणि पुणे राज्यात शनिवार 30 नोव्हेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार आहे. हा थंडीसाठीचा यलो अलर्ट असेल. उर्वरित महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवसांसाठी हवामान शुष्क राहणार आहे. या भागात कोणताही अलर्ट नसेल.
आयएमडीच्या माहितीनुसार, मुंबई मध्ये 5 डिसेंबर पर्यंत हवामान 19 ते 35 डिग्री सेल्सियस मध्ये राहणार आहे. मुंबईमध्ये सकाळी आकाशात धुकं राहील.
अलीकडे मुंबईकरांच्या दिवसाची सुरूवात थंडगार आणि धुक्यात होत आहे पण हळूहळू आठवड्याच्या शेवटी तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे आणि ते जास्त वाढणार नाही.