Maharashtra Election Results 2019 LatestLY Marathi Live Streaming: कोणाची हाती येणार सत्ता, येथे पाहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स
Vidhan Sabha Result | File Image

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष ज्या निकालाकडे लागले आहे तो महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल आज लागेल. त्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून हळूहळू एका-एका फेरीचे निकाल आपल्यासमोर येतील. गेल्या महिन्याभरापासून ज्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर रणधुमाळी सुरु होती ती त्यात जनमताचा कौल कुणाला मिळाला, कोणत्या पक्षाचे पारडे आज जड राहणार आणि कोणाची हाती सत्ता येणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळतील. विधानसभेची निवडणूक प्रक्रिया ही एकाच टप्प्यात झाली असून राज्यात 288 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पाडली. सर्वच पक्षांनी केलेल्या प्रचाराचे स्वरुप पाहता हा निकाल खूपच अटीतटीचा असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हळूहळू आपल्याकडे एक मतदारसंघाचे निकाल आपल्याकडे येतच राहतील.

राज्यातही पुन्हा भाजप सत्ता येणार की काँग्रेस पक्ष हे चित्र बदलणार हे पाहणे सर्व जनतेसाठी औत्सुक्याचे असणार आहे. त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाची इत्यंभूत माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी लेटेस्टली मराठीने पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी LatestLY Marathi च्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हेदेखील वाचा- Maharashtra Election Results 2019: मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात येण्याची शक्यता, इथे पाहता येणार निकाल

राज्यात यंदा मतदानाचा आकडा घसरला आहे. विधानसभेसाठी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात सरासरी 61.13 टक्के मतदान झाले आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 जागा मिळवणे आवश्यक असते. एक्झिट पोलच्या निकालानुसार राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. आता नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे काही तासांतच स्पष्ट होईल.