MNS | Twitter

लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला सशर्त पाठिंबा देणार्‍या मनसे कडून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Graduates Constituency) अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक भाजपाचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) विरूद्ध मनसेचे अभिजीत पानसे अशी होणार होती पण भाजपा नेत्यांच्या शिष्टाई नंतर मनसेने या मधून माघार घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यामागे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे दूरगामी राजकीय गणित असल्याचा दावा मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी केला आहे.

लोकसभा निवडणूक निकालापूर्वी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भात राज ठाकरेंना वैयक्तिक विनंती केली होती. त्यानंतर भाजपा उमेदवार निरंजन डावखरे 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झाले होते. राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय घेतला असल्याचे नितीन सरदेसाई यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघ लढण्याची संपूर्ण तयारी मनसे कडून करण्यात आली होती. पण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेण्याचा निर्णय झाला आहे. याचा पक्षाला काय फायदा होईल, हे तुम्हाला येत्या काळात दिसेल. विधानसभा निवडणुकीत इतरांना पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही. अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितल्याचे नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात; शिक्षक-पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत .

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.