Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

हवामान विभागाने चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. पालघर, ठाणे, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पाच ते आठ मार्च दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठं नुकसान झाले. (Nashik Unseasonal Rain: नाशिक जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पाऊस, अनेक ठिकाणी विद्युतप्रवाह खंडीत; पिकांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल)

या अवकाळी पावसाने विक्रमगड, जव्हार आणि पालघर तालुक्यातील शेतकरी तसेच व्यवसांयकांची चिंता वाढवली आहे. या पावसामुळे आंबा तसेच इतर रब्बी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये ही कांदा, गहू, हरभरा, आंबा द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील विविध विभागांमध्ये दमदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडू शकतो असे वर्तमान हवामान विभागाने वर्तवले आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ग्रामीण भागासाठी काहीसे महत्त्वाचे असणार आहे.