Maharashtra Unlock Update: राज्यातील निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत; अनलॉकबाबत राज्य सरकारचं स्पष्टीकरण
Pune Coronavirus Lockdown (Photo Credits: ANI)

राज्यात पाच टप्प्यात अनलॉकिंग होणार असून उद्यापासून या प्रक्रीयेला सुरुवात होणार अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काही वेळापूर्वी केली होती. मात्र आता राज्यातील निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. ट्विटच्या माध्यमातून माहिती देत सरकारने अनलॉकबद्दलचे संभ्रम दूर केले आहेत. राज्यात टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याबाबतचा प्रस्तावावर अद्याप विचार सुरु असून संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्यांसंबधित अंमलबजावणी केली जाईल. तसंच स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत असून त्यानंतरच अधिकृत निर्णय होणार असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत  काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. मात्र कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे करायचे याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. (Maharashtra Unlock: राज्यात 5 टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; जाणून घ्या काय आहेत 'हे' टप्पे)

MAHARASHTRA DGIPR Tweet:

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होणार असून जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता याद्वारे हे 5 टप्पे ठरवण्यात आले आहेत. यातील सर्वात कमी पॉझिटीव्ही रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध नसतील. पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्हे येत असून उद्यापासून त्यांच्या अनलॉकिंग प्रक्रीयेला सुरुवात होईल.

तसंच मुंबई लोकलबद्दलही वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते. मुंबई अद्याप दुसऱ्या टप्प्यात असून  जेव्हा मुंबई पहिल्या टप्प्यात पोहचेल तेव्हा लोकल ट्रेन्स सुरु होतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.