Tourism | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत आहे. यामुळे राज्यात अनलॉक (Unlock) प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. प्रदेशाच्या पॉझिटीव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथील केले जात आहेत. आता राज्यातील पालघर (Palghar) जिल्ह्यात पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी विविध बांध, झरे, नदी आणि समुद्र किनारे यांसारख्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता या आदेशात बदल करण्यात आले आहेत. नदी, किल्ले, समुद्र किनारे यांसारख्या पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिघातच हे आदेश लागू राहणार आहेत.

पुढे ते म्हणाले की, पालघर हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्यामुळे पूर्ण निर्बंधांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. यापूर्वी 10 जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात वसई वगळता इतर सात तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेश मनाई करण्यात आली होती. मात्र सुधारित आदेश हे 9 ऑगस्टपर्यंत लागू असणार आहेत. (Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! 5 पैकी कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद? घ्या जाणून)

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कोविड-19 संसर्ग दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दृष्टीने परिस्थिती सुधारत असल्याने पालघर जिल्हा अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, पालघरमध्ये शनिवारपर्यंत कोरोना रुग्णसंख्या एकूण 1,13,136 इतकी आहे. तर मृतांचा आकडा 2,358 इतका झाला आहे."

दरम्यान, कालच्या अपडेटनुसार, राज्यात 10697 नवे रुग्ण आढळून आले असून 360 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14,910 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका आहे.