जिम मालकांची जिम सुरु करण्याची तयारी (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार नियम शिथल करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच दरम्यान आता सलून नंतर आता जिम सुरु करण्याबाबत अद्याप संभ्रम  कायम आहे. परंतु जिम मालक आणि ट्रेनर हे पुन्हा जिम सुरु करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता त्या संबंधित सर्व नियमांचे जिममध्ये पालन करण्यात येईल असे ही मुंबईतील जिम मालकांनी म्हटले आहे.(Maharashtra Unlock 1: पुणे शहरात केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यासाठी नियमावली; महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती)

अभिषेक पाटील नावाच्या एका जिम मालकांने असे म्हटले आहे की, जिम सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचे ऐकले आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप काही घोषणा करण्यात आलेली नाही. जिम सुरु झाल्यास प्रत्येक व्यक्तीचे शरिराचे तापमान गेटवरच तपासले जाणार आहे. त्याचसोबत जिममध्ये सॅनिटायझरची सुद्धा उपलब्धता असणार आहे. जिम प्रत्येक 3 तासानंतर सॅनिटाइज करण्यात येणार आहे. ग्राहकांना ठरवून दिलेल्या बॅचनुसार जिम मध्ये येण्यास परवानगी असणार आहे. म्हणजेच आठवड्यातून तीन दिवस दीड तासांसाठी जिम करण्यासाठी ग्राहकांना येता येणार असल्याचे ही अभिषेक पाटील यांनी म्हटले आहे.(Maharashtra Unlock 2.0: महाराष्ट्रात Gym आणि धार्मिक कार्यक्रम सुरु करण्याबाबत मंत्री अस्लाम शेख यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती) 

दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या संबंधित समोर आलेल्या आकडेवारी नुसार, मुंबईत  आणखी 1 हजार 297 कोविड19 च्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 72 हजार 287 वर पोहचली आहे. यापैंकी 4 हजार 177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 39 हजार 744 जणांना कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.