Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. तर राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी आजपासून काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्याच्या सीमा अद्याप बंद आहेत. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशातील एक ट्रक चालक वाशिम येथून प्रवास करत होता. मात्र काही कारणामुळे तो आजारी पडला असता त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला असता ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे चालकाने ज्या ठिकाणी पेट्रोल भरले तो पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे.

राज्य सरकारने जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पोहचवणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच आता विविध राज्यात अडकलेले मजूर आणि कामगारांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने स्पेशल ट्रेन आणि बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपू्र्वी एका व्यक्तीने हजारो किलोंचा कांदा खरेदी करत घरी पोहचण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ऐवढेच नाही तर काही कामगारांनी चालत जाण्याचा निर्धार सुद्धा केला आहे. (Maharashtra Government Lockdown Guidelines: महाराष्ट्र लॉकडाऊन गाईडलाईन्स; दिलासा मिळाला पण संभ्रम वाढला; स्थानिक प्रशासनावर भिस्त, दुकानदारांसमोर पेच)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची सद्यची परिस्थिती पाहून तरी नियमांचे पालन करावे. राज्य सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.