Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) मध्ये काल (20 डिसेंबर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe)  यांचं निलंबन केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी अजून काही जणांना अटक केली आहे. बीडमधून आणखी संजय सानप, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय अध्यक्ष सुखदेव ढेरे (Sukhadev Dere) आणि बंगळुरू येथून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार (Ashwin Kumar)  यांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे.

जीए टेक्नॉलॉजीला 2017 पासून परीक्षांसाठी कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी तपास वेगवान केला. काल तुपेंच्या घरी दुसर्‍या धाडेत 2 कोटी रूपये आणि सोनं हाती लागले आहे. आतापर्यंत या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. नक्की वाचा: Maha TET Exam Scam: शिक्षक पात्रता परीक्षेमधील गैरव्यवहाराबाबत तुकाराम सुपे निलंबित; सात दिवसात येणार चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल.

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आणि बंगळूरमधून अटक करण्यात आलेला आश्विन कुमार हा यापूर्वीच अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखचा वरिष्ठ होता. 12 डिसेंबरच्या म्हाडा पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीतून टीईटी परीक्षेचा घोळ समोर आला. त्यनंतर पुढील अटकसत्र सुरू झाली आहेत. 2018 TET परीक्षेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी सुखरेदव ढेरे विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये पास होण्यासाठी उमेदवारांना ओएमआर शीट रिकामी ठेवण्याची सूचना होती. पेपर स्कॅन करून तपासताना ते भरले जात असे. कुणी नापास झाल्यास रिचेकिंगला टाकण्यास सांगितले जात होते. त्यामध्ये पास केले जात होते. अशाप्रकारे पास करण्यासाठी परीक्षार्थ्याकडून 35 हजार ते 1 लाख रूपये घेतले जात होते.