Maharashtra Talathi Bharti 2019 (Photo Credits: mahapariksha.gov.in)

Score list of Revenue Department Examination (Talathi):  महाराष्ट्र महसूल विभाग (Maharashtra Revenue Department) अंतर्गत घेण्यात आलेल्या तलाठी (Talathi) लेखी परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. लेखी स्वरूपात घेण्यात 200 गुणांच्या परीक्षेचा आन्सर की  काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर आता या परीक्षेचा निकाल काहीर करण्यात आला आहे. 21 जुलै 2019 दिवशी ही परीक्षा घेण्यात आली असून आता या परीक्षेच्या लेखी गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल ई महापरीक्षा पोर्टलवर पाहता येणार आहे. यामध्ये उमेदवारांच्या परीक्षार्थी क्रमांकानुसार, लेखी परीक्षेतील गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कसा पहाल तुमचा निकाल?

  • www.mahapariksha.gov.in वर क्लिक करा.
  • ई महापरीक्षा पोर्टलवर उजव्या बाजूला तुम्हांला RESULT, ANSWER KEY, RESPONSE SHEET असा पर्याय दिसेल.
  • त्यावर तलाठी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तलाठी वर क्लिक केल्यानंतर तुम्हांला सिरिअल नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे.
  • तुमच्या परीक्षार्थी क्रमांकानुसार तुम्हांला हा निकाल पाहता येणार आहे.

तलाठी पदासाठी 1809 जागांसाठी सध्या लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. राज्यभरारून पदवीधारक उमेदवार या परिक्षेसाठी सामोरे गेले होते. लेखी परीक्षेच्या निकालानंतर आता उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या जातील. त्याची यादी आणि वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.