Employees Strike | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांकडून त्यांचे पगार वाढ आणि सातवा वेतन लागू करण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. याच कारणास्तव आता येत्या 30 नोव्हेंबर पासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचे समोर आले आहे. या संपामध्ये लाखोंच्या संख्येने कामगार सहभागी होणार असल्याची माहिती साखर कामगार युनियन कडून देण्यात आली आहे. तसेच कामगारांकडून राज्य सरकार आणि साखर संघाकडे त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकवेळी पाठ पुरावा केला जात आहे.(Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज 'मातोश्री'वर धडकणार मशाल मोर्चा; पंढरपूर मधून निघणार आक्रोश मोर्चा)

राज्यात साखर कारखान्याच्या मालकांची सत्ता आल्यास कामगारांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र त्या उलटच सर्व काही घडत असून त्यांच्या मागण्यासुद्धा अद्याप पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच कामगारांना आता आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नसून येत्या 30 नोव्हेंबर पासून पहाटे 4 वाजल्यापासूनच बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Maharashtra Mission Begin Again अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या)

दरम्यान, सांगलीत राज्यामधील कामगार युनियनच्या कार्यकरिणीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारकडून साखर कामगारांच्या मागण्यांकडे दुलर्क्ष केल्यास तर आंदोलन असेच पुढे सुरु राहिल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. तर साखर हंगाम सुरु होणार असून याचा फटका आता कारखानदारांना बसण्याची शक्यता आहे.