Lottery | (Photo Credits: Getty Images)

राज्यातील झुगार, मटका यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र लॉटरी (Maharashtra State Lottery) सुरु केली. महाराष्ट्र लॉटरीची तिकिटे खरेदी करुन नशीब आजमावून पाहणाऱ्या मंडळींची संख्या बरीच मोठी आहे. अशा लोकांसाठी लॉटरीचे तिकीट आणि लॉटरीची सोडत (Maharashtra State Lottery Results) याबाबत प्रचंड उत्सुकता असते. यासोबतच राजश्री लॉटरी (Rajshree Lottery) बाबतही अनेकांना उत्सुकता असते. या दोन्ही लॉटरींच्या सोडत आणि निकालाबाबत घ्या जाणून. लॉटरीबाबतचे वृत्त लेटेस्टली मराठी केवळ वाचकांच्या माहितीसाठी देत आहे. लॉटरीबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधितांनी संबंधित लॉटरीच्या अधिकृत संकेतस्थळ अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा.

महाराष्ट्र सरकार रविवार आणि राष्ट्रीय सुट्टीचे तीन दिवस वगळून आठवड्यातील सर्व दिवशी लॉटरी सोडत आयोजित करत असते. त्यात ऑक्टोबर महिन्यापासून महिन्यातील प्रत्येक आठवड्यात एकूण 10 सोडती घेतल्या जातात. यात 6 साप्ताहिक तर 4 मिनी लॉटरी सोडती असतात. या सोडतीचा तपशील खालील तक्त्याप्रमाणे.

Maharashtra State Lottery Results

दरम्यान, महाराष्ट्र लॉटरीनुसार राज्यात प्रत्येक आठवड्यात 19 व्यक्ती लखपती होऊ शकतात. त्यासाठी 1,80,10,000 रुपये इतक्या रकमेची 2,79,138 इतकी बक्षिसे असतील.

Maharashtra State Lottery Results

दरम्यान, राजश्री लॉटरी हा सुद्धा एक नशिबाचा खेळ आहे. वय वर्षे 18 पूर्ण असलेला कोणताही व्यक्ती या लॉटरीत सहभागी होऊ शकतो. 18 वर्षे पूर्ण असलेले लोक सहजपणे साइन अप करू शकतात आणि गेम खेळू शकतात. साइन अप नंतर लोक स्पर्धेत सामील झाल्यानंतर निकाल पृष्ठावरील प्रत्येक १- ते २० मिनिटांत त्यांचा निकाल तपासू शकतात. त्यासाठी तुम्हाला राजश्री लॉटरीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. राजश्री लॉटरी गेम हा पूर्णपणे नशीबावर आधारित खेळ आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍या कोणत्याच व्यक्तीला जिंकण्याची हमी मिळत नाही. इच्छुक व्यक्ती कधीही हा खेळ खेळू शकतात आणि जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा त्यांचे नशीब आजमावू शकतात.