नेतृत्वबदल केल्यानंतर काँग्रेस पक्ष जोरदार कामाला लागला आहे. महाराष्ट्रात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस किमीटी निवड मंडळाची (Maharashtra state Congress Paliamentary Board) एक बैठक पार पडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हेही या बैठकीस उपस्थितीत राहणार आहेत. ही बैठक महिला विकास महामंडळ सभागृह, नरिमन पाईंट येथे आज दुपारी तीन वाजता पार पडणार आहे.
प्राप्त माहितीनुसार या बैठकीस विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील सोमवारीच मुंबई येथे पोहोचले आहेत. एच के पाटील पक्षाच्या विविध नेत्यांशी वेगवेगळी बैठक घेतली.
सह्याद्री या सरकारी विश्रामगृहावर थांबलेल्या प्रभारी एच के पाटील यांची भेट घेणाऱ्यांमध्ये महाराषट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेस कँपेन कमीटीचे चेअरमन नसीम खान, मुंबई काँग्रेस कोऑर्डिनेशन कमेटी चेअरमनअमरजीत सिंह मन्हास आणि युवक काँग्रेसचे नेते सहभागी होती. एच के पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली. तसेच आगामी निवडणुकांबाबत फिडबॅक घेतला. (हेही वाचा, Nashik Municipal Corporation Election 2022: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांची जोरदार तयारी)
आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातील इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असावी याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच आगामी कालात पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी काय काय करावे लागेल. काय बदल करावे लागतील, याबाबतही मंथन होण्याची शक्यता आहे.