Maharashtra State Board HSC Result 2020: बारावीच्या निकालाची तारीख ठरली? विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
Results 2019 (Photo Credits: Facebook)

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल गेल्यावर्षी 28 मे रोजी लागला होता. तसेच यावर्षीही बारावीचा निकाल (Maharashtra State Board HSC Result 2020) 28 मे ला दुपारी 1 वाजता लागणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अनेकांच्या करियरला टर्निंग पॉईंट ठरणारी ही परीक्षा राज्यभरात 9 विविध जिल्हानिहाय शिक्षण मंडळांकडून एकाच वेळी घेतली जाणार आहे. एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परिक्षा देत आहेत. यात मुलांची संख्या 8 लाख 43 हजार 553 तर, 6 लाख 61 हजार 325 मुलींचा यात समावेश आहे. राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली. यावर्षी 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 राज्य मंडळांमार्फत परीक्षा सुरु झाली आहे. तसेच परीक्षा दरम्यान गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी मंडळातर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती देखील सुरू करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, परिक्षा पार पडल्यानंतर निकाल कधी लागणार, याची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. यातच गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल 28 मे 2020 रोजी लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या परिक्षेत गेल्या वर्षी मुलींनी बाजी मारली होती. परंतु, यावर्षी कोण बाजी मारणार, यासंदर्भात सर्वांना उत्सुकता आहे. हे देखील वाचा- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उदय सामंत यांच्यासहित या नेत्यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या दहावी, बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

बारावी परीक्षेला गेल्यावर्षी राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 3 लाख 83 हजार विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहे. राज्यातील 2 हजार 957 केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 29 मे पासून विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज दाखल करायला सुरुवात केली होती.