Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षांसाठी (Maharashtra SSC Exams 2022) प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता दहावी परीक्षेसाठी आवेदनपत्रे म्हणजेच फॉर्म दाखल करण्याची प्रक्रिया येत्या 18 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने (Online Application) पार पडेल. तसेच, ही सर्व अवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर स्वीकारली जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले आहे की, ''महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र १८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर घेतले जातील.तपशील खाली पहा''. (हेही वाचा, Maharashtra HSC Exams 2022: इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धीने फॉर्म भरण्यास 12 नोव्हेंबर पासून सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती)

ट्विट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी , नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, ITI घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सदर परिक्षेष प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायची आहेत. अधिक तपशिलासाठी वेबसाईटला भेट द्या. तसेच, वरील इमेजचा आधार घ्या.