Maharashtra Shikshak Bharti 2020: गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षक भरतीच्या (Teacher's Recruitment) मागणीला महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra State Government) अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यानुसार राज्यात जवळपास 6,000 जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे. या भरतीसाठी राज्यातील तमाम शिक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत होते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरसच्या काळात या शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने (Online Registration) होणार आहे असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या जागांसाठी अर्ज करताना शिक्षकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
शिक्षकांची नोंदणी प्रक्रिया आणि मुलाखत प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया 7 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2020 दरम्यान होणार आहे. rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोक नोंदणी करू शकतात.हेदेखील वाचा- Maharashtra Job Vacancies 2020: लॉकडाऊन मध्ये जॉब गमावलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, सरकारकडून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजिन, कशी कराल नोंदणी?
त्यानंतर 12 ते 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन मुलाखत प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे जागांकरिता नोंदणी करणा-यांनी याबाबत नोंद घेऊन त्यानुसार अर्ज करावे.
दरम्यान लॉकडाऊन काळात नोक-या गेलेल्या तरुणांसाठी ठाकरे सरकाराने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्यात सरकारने 275 कंपन्यांशी संपर्क साधून 43 हजार 34 जागांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. या बेरोजगार तरुणांसाठी सरकारने ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केले आहे.यासाठी तरुणांनी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करणे गरजेचे आहे.
या मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून अभियांत्रिकीपर्यंतची शैक्षणिक पात्रता असलेल्यांना 18,000 रुपयांपर्यंतची नोकरी मिळू शकते. मात्र यासाठी या मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे महत्त्वाचे आहे