Sex Racket Busted in Pune: पुण्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, 6 तरूणींची सुटका
प्रतिकात्मक फोटो. (Photo Credit: PTI)

पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला (Sex racket busted in Pune) आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 6 तरूणींची सुटका करण्यात आली आहे. याचबरोबर पोलिसांनी लॉजच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत गुप्तता पाळून हा व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

रवीश शेट्टी (वय, 35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा कर्नाटकातील उडपी येथील रहिवाशी असून तो खडकी- दौंड येथील सुर्या लॉजवर तरूणींकडून वेश्याव्यवसाय करून घ्यायचा. याची माहिती मिळताच सायबर पोलीस आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा छापा टाकला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच 6 तरूणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत. हे देखील वाचा- Pushpak Express Gang Rape: लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील 8 आरोपींना अटक

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी लोणावळ्यातील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. तर, त्यांनी दिल्ली आणि छत्तीसगडमधील दोन महिलांची सुटका केली. धनंजय काटवारू राजभर (37) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मुंबईतील चेंबूर येथील रहिवाशी आहे.