
अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील एका इमारतीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरच्या साई अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसाच्या एका पथकाने घटनास्थळी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटमधील घरमालक आणि त्याची पत्नी या दोघांनी दोन तरुणींना पैशांचे आमिष दाखवत हे कृत्य करण्यासाठी आणले होते. हा व्यक्ती एका ग्राहकाकडून एका तासावा हजार रुपये आणि एका रात्रीसाठी 2 हजार रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी घटनास्थळी दोन मुली, घरमालक, एक महिला आढळून आली. तर, पोलिसांना पाहताच एका ग्राहकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोन आणि पैशांसह आणि इतर साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-Jalna: लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केल्याचा तरूणीला आला राग; उचलले धक्कादायक पाऊल
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये मुंबई गुन्हे शाखेने छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांननी एका दक्षिणात्य अभिनेत्रीला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी तिला ड्रग्जसेवन करताना रंगे हाथ पकडली होती. महत्वाचे म्हणजे, चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने शरीर विक्री करून पैसे कमवत असल्याचे तिने सांगितले आहे.