(Archived, edited, symbolic images)

लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केले म्हणून एका तरूणीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्याला अश्लील मॅसेज केले आहेत. ज्यामुळे पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. ही घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसावंगी (Ghansavangi) येथील आहे. तरूणाच्या पत्नीने स्थानिक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित तरूणीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. लग्नानंतर या मुलाने माझ्यासोबत बोलणे बंद केले आणि त्याचा राग आल्याने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करुन इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवल्याचे आरोपी तरूणीने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणाचे 10 जानेवारी 2021 मध्ये झाले. परंतु, त्यानंतर त्याच्या मोबाईलवर एका महिलेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अश्लील मॅसेज येऊ लागले. याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तसेच बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे मेसेज करण्यात येत असल्याचे सायबर पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी माहिती काढली. त्यावेळी एका मुलीने बनावट अकाऊंट बनवून मॅसेज केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले. त्यानंतर या मुलीची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबुल केला. या मुलीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Dombivli Crime: प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, बदलापूर-कर्जत रोडच्या कडेला फेकला मृतदेह, डोंबिवली येथील एका महिलेला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी आणि फिर्यादी महिलेचा पती दोघेही मित्र आहेत. परंतु, मित्राने लग्न झाल्यापासून आपल्याशी बोलणे बंद केले होते. यामुळे तिने रागाच्या भरात इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट बनवून अश्लील मॅसेज केल्याची कबूली दिली आहे.