COVID 19 In Maharashtra: राज्यात मागील 17 महिन्यातील निच्चांकी नवे कोरोनारूग्ण समोर; 24 तासांत  1736 जणांना कोविडचे निदान
कोरोना चाचणी | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज (11 ऑक्टोबर) 24 तासांमध्ये 1736 कोविड 19 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ही मागील 17 महिन्यांमधील राज्यातील निच्चांकी नोंद आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार दिवसभरात 36 रूग्ण दगावले आहेत. राज्यात कालच्या तुलनेत 550 रूग्ण कमी आढळले असले तरीही दगावलेल्यांच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ आहे. काल राज्यात 28 मृत्यू आणि 222294 नवीन रूग्ण आढळले होते.

16 मे 2020 नंतर आज 1736 इतके कमी कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रामध्ये आढळले आहेत. हे रूग्ण लाखभर कोविड टेस्ट मधून समोर आले आहेत. सामान्यपणे विकेंडला कोविड 19 टेस्ट चं कमी असतं त्यामुळे सोमवारी कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी दिसते.

महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 3033 रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर 32,115 जणांवर अजूनही कोविड 19 चे उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या 2,38,474 रूग्ण होम क्वारंटीन आहेत तर 1163 रूग्ण इंस्टिट्युशनल क्वारंटीन आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट देखील 97.34% असा समाधानकारक आहे. मृत्यू दर 2.12% आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज 15 जिल्हे आणि 5 महापालिकांमधून एकही कोरोना रूग्ण नोंदवला गेला नाही. मुंबई जिल्ह्यांत सर्वाधिक 401 रूग्ण समोर आले आहेत.

राज्यात सध्या नवरात्रीची धूम सुरू आहे. दसरा, दिवाळी, ईद सारखे सण आता एकामागोमाग एक येणार असल्याने प्रशासनाकडून अनावश्यक गर्दी टाळून सुरक्षित वातावरणामध्ये सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.