Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 257 जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाख 66 हजार 368 वर पोहोचली
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने कहर केला आहे. महाराष्ट्रात आज 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 257 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाख 66 हजार 368 वर पोहोचली आहे.

राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालया (State Health Department) ने माहिती दिली आहे. (हेही वाचा - COVID19 Cases In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 1 हजार 90 नव्या रुग्णांची नोंद, 52 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज मुंबईत 1090 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 617 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 07 हजार 981 इतकी झाली आहे. यातील 78 हजार 877 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत 6033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.