Maharashtra Rains: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे कारण नाही, मात्र नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे.
पहा पोस्ट-
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde speaks to Raigad Collector and directs him to provide all assistance to rainfall & flood-affected people in the district and assures him of all help from the state government pic.twitter.com/tHgXCrNeFv
— ANI (@ANI) July 25, 2024
मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास सांगितले. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ढिगारा हटेपर्यंत पुढील काही तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. शिंदे यांनी जनतेला सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Orange Alert for Maharashtra: राज्यात मुसळधार पाऊस, पूरस्थिती मुळे अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी; जाणून घ्या Weather Forecast आणि सध्यास्थिती)
#WATCH | On the rainfall situation Mumbai, Pune and Raigad districts, Maharashtra CM Eknath Shinde says, " There is water on the roads and in houses of people in Pune. There is a lot of rain at Khadakwasla Dam and in the catchment area. The District Collector, Municipal… pic.twitter.com/wXECIy2aCL
— ANI (@ANI) July 25, 2024
मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, सरकार पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बोलले असून, एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरच्या उपलब्धतेबाबत सूचना दिल्या आहेत. मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरु आहे. मुंबईत 255 पंप सुरु असून मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण 18 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच 6 राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत,