गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत (Hearing) शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या चिन्हाचा निर्णय निवडणूक (Election Commission) आयोग करणार असल्याचा निर्णय झाला. तरी आता याबाबत निवडणूक आयोगाने पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच नुकतीच अंधेरीच्या पोटनिवडणूका (Andheri By Election) जाहीर करण्यात आल्या आहे. त्यासाठी दोन्ही गट नामांकन भरणार आहे. पण धनुष्यबान नेमका कुणाचा हा निर्णय अजून न झाल्याने तीढा कायम आहे. तरी या संबंधीत निर्णय लवकरच निवडणूक आयोग घेणार असुन निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला म्हणजेच ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटाला संबंधित कागदपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. तरी या कागदपत्राच्या सादरीकरनावरचं धनुष्यबाण नेमका कुणाचा हा फैसला होणार आहे.
तरी पक्षाचा चिन्ह कुणाला मिळणार याबाबत राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. पक्षाच्या चिन्हा बाबत तीन शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकतर पक्ष चिन्ह ठाकरे गटाला मिळू शकत कारण शिवसेनेच्या (Shiv Sena) स्थापने पासून ते त्यांचं आहे . किंवा ते शिंदे गटास मिळू शकत कारण त्यांच्याकडे अधिक आमदार (MLA) आहेत किंवा धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात येवू शकत म्हणजेच ते दोन्ही गटास मिळणार नाही. (हे ही वाचा:- Eknath Shinde On State's Health Sector: राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही)
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सुनावणीनंतर शिवसेना पक्ष चिन्हाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) गाटत आला आहे. तरी लवकरच होणाऱ्या पोटनिवडणूका (By election) आणि कागदपत्र सादर करण्याची अंतीम तारीख बघता पुढील काही दिवसातचं पक्ष चिन्हाचा फैसला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी धनुष्यबाण मिळवणे ही फक्त चिन्हाची लढाई नसून ती आता शिंदे-ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.