कोरोनाचा (Coronavirus) वाढता फैलाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन 5.0 (Lockdown 5.0) सुरु झाला असला तरीही काही नियम शिथिल करण्यात आले आहे. यासाठी अनलॉक 1 सुरु करण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी अनलॉक 1 (Unlock 1) च्या नादात सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडू नये महाराष्ट्र पोलिसांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनलॉक 1 च्या काळात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. अनेक लोक ऑफिसेसला जायला लागले आहेत त्यामुळे नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती दिली आहे.
'लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत, कोरोनाचा धोका नाही' असे सांगत महाराष्ट्र पोलिसांनी हा खास व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये बाहेर जाताना कोणती काळजी घ्या, सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे कराल याबाबत अॅनिमेशनच्या माध्यमातून एक खास व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. COVID-19 प्रार्दुभाव रोखण्यासाठी ऑफिसला जाणा-या कर्मचा-यांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वे
पाहा व्हिडिओ
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत, कोरोनाचा धोका नाही!
आवश्यकता नसल्यास घराबाहेर जाऊ नका, आणि गेलाच तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित राहा.#StaySafe pic.twitter.com/i8ZIHhg88B
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) June 13, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 779 ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय, 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे तसेच 8884 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी 3 लाखाच्या वर गेला असला तरी सद्य घडीला ऍक्टिव्ह आणि बरे झालेल्या रुग्णांच्या आकड्यानुसार कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे ही काहीशी दिलासादायक बाब म्हणता येईल.