ऑफिसमधील काम ( Photo Credit: PIXABAY )

देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला तरीही अनलॉक 1 (Unlock 1) सुरु झाले आहे. यात खाजगी तसेच सरकारी कार्यालये सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार सुरु करण्यात आली आहेत. मात्र अशा स्थितीत लोकांनी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry of India) काही महत्त्वाची अशी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक त्तवे जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात ऑफिसला जाणा-या कर्मचा-यांनी कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने लोकांनी या नियमांचे पालन करून योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

ऑफिसला जाणा-या कर्मचा-यांना आपल्या राहत्या ठिकाणीची तंतोतंत माहिती आपल्या ऑफिस अधिका-यास द्यावी. अन्यथा कोविड-19 चा प्रसार होऊ शकतो. लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अफवांनंतर ट्विटच्या माध्यमातून स्पष्टीकरण

आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे

1. तुम्ही जर कंटेनमेंट झोन मध्ये राहात असाला तर याची माहिती आपल्या कार्यालयाला द्यावी

2. कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या ऑफिस वाहनचालकास वाहन चालविण्याची परवानगी देऊ नये.

3. वाहनचालकाने कर्मचा-यांशी योग्य ते अंतर राखावे.

4. वयोवृद्ध, गरोदर महिला यांनी शक्यतो वर्क फ्रॉम होम हा पर्याय स्विकारावा.

5. बाहेरून आलेल्या व्यक्तीस ऑफिसमध्ये येताना व्हिजिटिंग आयडी देण्यात यावा. तसेच त्याची माहिती ठेवावी.

6. मिटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा.

7. जेवताना गर्दी करु नये.

8. व्हॅले पार्किंग ऑटो ऑपरेशनला असलेली उत्तम

9. ऑफिस लिफ्टमध्ये मर्यादित लोक असावीत.

10. सॅनिटायजरचा वांरवार उपयोग करावा.

यासोबतच ऑफिसेसमध्ये जाणा-या प्रत्येक कर्मचा-याने चहूबाजूला लक्ष ठेवावे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. काही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्वरित आपल्या वरिष्ठांस त्याची माहिती द्यावी. सध्याच्या परिस्थितीत स्वत:ची काळजी घेणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.