Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रामध्ये पोलिस देखील कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. कोविड योद्धा म्हणून काम करणार्‍या पोलिस दलामध्ये मागील 4 महिन्यांपासून अधिक काळात सुमारे 12,877 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मागील 24 तासांत 117 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 जणांचा कोविड 19 मुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात 12,877 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यापैकी 10,491 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2255 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 131 पोलिस कर्मचार्‍यांनी आत्तापर्यंत जीव गमावला आहे.

ANI Tweet

मुंबई पोलिस दलामध्ये कोविड 19 मुळे मृत्यू होणार्‍यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत परिवाराला देण्यात येईल अशी माहिती दिली आहे. सोबतच गृहमंत्र्यांनी पोलिस कर्मचारी जर पोलिस क्वार्टर्समध्ये राहत असतील तर त्यांना निधन झालेल्या कर्मचार्‍याच्या निवृत्तीपर्यंत तेथे राहण्याची मुभा दिली आहे. कुटुंबाला तात्काळ घर खाली करण्याची जबरदस्ती केली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.