Maharashtra Police | (PTI photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा विळखा बसलेल्या महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलात आजही कोरोना बाधित नवे रुग्णांची भर पडली आहे. मागील 24 तासांत 303 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस दलातील कोरोना बाधितांचा आकडा 13,180 इतका झाला आहे. त्यापैकी 2,389 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर एकूण 136 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (Use A Mask: बबड्या मास्क लावतो, तो खरचं सुधारलायं; महाराष्ट्र पोलिसांचं सुचक ट्विट; Watch Photo)

कोरोना व्हायरसच्या संकट काळात राज्यातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा, नियमांची सुव्यवस्था जपणासाठी पोलिसांनी जीवाची बाजी लावून कार्य केले. अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका होताच. मात्र तरी देखील या कोरोना योद्धांनी जीवाची पर्वा केली नाही. दरम्यान, कोरोना बाधित पोलिसांना योग्य उपचार आणि आवश्यक सेवा मिळतील याकडे गृहखात्याचे लक्ष होते होते. तसंच पोलिसांना इम्युनिटी ब्युटर्स गोळ्या देखील देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांकडून दरदिवशी कोरोना संबंधित जागरुक करणारं क्रिएटीव्ह ट्विट करण्यात येतं.

ANI Tweet:

कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही आणि गणेशोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सणासुदीच्या या काळात नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होऊ नये, यासाठी पोलिसांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरील ताणही अधिक वाढणार आहे.