Maharashtra Police Bharti 2019 Required Documents: महाराष्ट्रात आज (3 सप्टेंबर) पासून पोलीस शिपाई भरती 2019 (Maharashtra Police Bharti) ला सुरूवात झाली आहे. पहिल्यांदा ई पोर्टलच्या माध्यमातून होणार्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आनेक तरूण तरूणी उत्सुक आहेत. यंदा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा लेखी परीक्षा होईल त्यानंतरच शारिरीक चाचणी घेऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे ऑनलाईन माध्यमातून काही प्रमाणपत्र, ओळखपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे.
इच्चुकांना 3-23 सप्टेंबरदरम्यान mahapariksha.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अकाऊंट आणि रजिस्टेशन करून अर्ज करायचा आहे. यामध्ये तुमचा युजर आयडी आणि पासवर्डच्यामाध्यामातून तुम्हांला अकाऊंटवर अपडेट्स पाहता येतील. Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र राज्यभर पोलिस शिपाई भरती 2019 ला आजपासून सुरूवात; mahapariksha.gov.in वर करा अर्ज
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019 साठी कोणती कागदपत्र आवश्यक
ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज 3-50 KB असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
यंदा महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019 मध्ये पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलिस दलातील पोलिस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, बॅन्डस्मॅन या पदासाठी पोलिस भरती 2019 जाहीर करण्यात आली आहे.