प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

Maharashtra PG Medical Admission 2019: काही दिवसांपासून मेडिकल पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करणे आणि अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र सोमवारी (20 मे) सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव (Guv C Vidyasagar Rao) यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी नागपूर खंडपीठाने आणि सर्वोच्च न्यायलयाने यंदा वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास सुरुवात केली होती.(Maharashtra PG Medical Admission 2019: पीजी मेडिकल प्रवेशाबाबतच्या एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांची स्वाक्षरी)

मात्र आता राज्यपाल यांनी स्वाक्षरी केल्यावर पीजी प्रवेश आणि एमबीबीएस प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच खुल्या वर्गासाठी या अध्यादेशाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.