Maharashtra PG Medical Admission 2019: पीजी मेडिकल प्रवेशाबाबतच्या एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांची स्वाक्षरी
मेडिकल पीजी प्रवेशाबद्दल कॅबिनेट निर्णयानंतर एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव (Guv C Vidyasagar Rao) यांनी स्वाक्षरी केली आहे.
Maharashtra PG Medical Admission 2019: गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेचा तिढा वाढलेला दिसून येत आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेबद्दल मुतदवाढ देण्यात येणार असल्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता मेडिकल पीजी प्रवेशाबद्दल कॅबिनेट निर्णयानंतर एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव (Guv C Vidyasagar Rao) यांनी स्वाक्षरी केली आहे.
परंतु मेडिकल पीजी प्रवेशासाठी आणि एमबीबीएस प्रवेशाला मराठा आरक्षण लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र खुल्या वर्गासाठी या अध्यादेशाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पदव्युतर मेडिकल प्रवेशप्रक्रियेचा तिढा सुटेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.(मराठा आरक्षण: पदव्युत्तर मेडिकल प्रवेशप्रक्रीयेचा तिढा सुटण्याची चिन्हं; सरकारला वटहुकूम काढण्यास निवडणूक आयोगाची परवानगी)
यापूर्वी नागपूर खंडपीठाने आणि सर्वोच्च न्यायलयाने यंदा वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास सुरुवात केली होती.
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2019 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

