Maharashtra Rajya Lottery: महाराष्ट्रात दर मंगळवारी 'पद्मिनी' (Padmini Lottery) या साप्ताहिक लॉटरीचा निकाल जाहीर केला जातो. आजचं लॉटरीचं तिकीट तुम्ही देखील काढलं असेल तर आज नेमका ऑनलाईन निकाल कसा बघायचा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल.. हो ना? आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. ही लॉटरी महाराष्ट्र राज्यात कायदेशीर नियमांनुसार मान्यताप्राप्त आहे. याशिवाय उद्या वर्तमानपत्रामध्ये या लॉटरी निकाल लागेल पण संपूर्ण 5 लाखाचे पहिले बक्षीस आणि सोबतच अन्य अनेक बक्षिसे कोणाला लागतायत हे पाहण्यासाठी तुमची उत्सुकता ताणून ठेवणे तुम्हालाही आवडणार नाही ना? म्ह्णूनच त्याच्या आधीच ऑनलाईन 'पद्मिनी साप्ताहिक लॉटरी सोडती'चा निकाल पाहा.. सिनियर सीटीझन्ससाठी सरकारच्या 'या' योजना येतील कामी, जाणून घ्या
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
-lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
-त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
-त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
-यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
-पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
-या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
विजेती रक्कम कधी मिळवाल?
विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुम्हांला 'सागरलक्ष्मी साप्ताहिक लॉटरी' मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.