Raj Thackeray | MNS | File Photo | (Photo Credits- Facebook @Sachin Maruti More)

विरार-डहाणू (Virrar- Dahanu) चौपदरीकरणामध्ये सफाळे उंबरपाडा आणि इतर दहा गावांच्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर घोषित न करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. यामुळे मनसेने थेट या प्रकल्पाच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात कपडे काढून आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश घरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मनसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मंगशे घरत यांना ताब्यात घेतले आहे.

विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या प्रकल्प तिसऱ्या टप्प्यात विविध तालुक्यातील जमीन संपादित केली जाणार आहे. यात पालघर तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. दरम्यान, प्रांताधिकारी यांनी 9 गावांचा भसंपादनाचा दर जाहीर केला आहे. परंतु, उंबरपाडा यांच्यासह इतर दहा गावांचे दर अद्यापही जाहीर केले गेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांच्या वतीने कपडे काढा आंदोलन सुरु केले. इतर गावांचा दर जाहीर झाला असताना उंबरपाडा व दहा गावांचा दर जाहीर का केला नाही ? असा सवाल मनसेच्या शिष्टमंडळाने उपस्थित केला. तसेच हा दर आजच जाहीर करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. हे देखील वाचा-  महाराष्ट्र विधिमंडळात निलंबित करण्यात आलेल्या 12 भाजपा आमदार प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार; आशिष शेलार यांची माहिती

परंतु, पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा दर कायद्यान्वये लगेच जाहीर करता येणार नाही असे सांगितले. यावर संतापलेल्या मंगेश घरत यांना प्रांताधिकारी यांच्या समोर आपले कपडे काढण्यास सुरुवात केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंगेश घरत यांना ताब्यात घेतल्याची माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे.