महाराष्ट्र: स्थलांतरित कामगार स्पेशल ट्रेनने घरी जाण्यापूर्वी नागपूर महापालिकेकडून आरोग्य तपासणी, रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात
नागपूर स्थलांतरित कामगार आरोग्य चाचणी (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस कायम राहणार आहेत. याच दरम्यान आता केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे यासाठी स्पेशल ट्रेन आणि बसची सोय केली आहे. मात्र आपल्या राज्यात आणि घरी परतण्यापूर्वी स्थलांतरित कामगारांची आरोग्य चाचणी आणि रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे. विविध राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार अडकून पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान आता नागपूर येथे सुद्धा महापालिकेकडून शेल्टर होममध्ये राहणाऱ्या नागरिक घरी जाण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी आणि रजिस्ट्रेशन करुन घेण्यात येत आहे.

स्थलांतरित कामगार, विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून स्पेशल ट्रेनची सोय करुन देण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्यातील कामगार स्पेशल ट्रेनच्या सहाय्याने आपापल्या राज्यात परतत आहेत. मात्र याच दरम्यान आज केरळामधील थिरुवंतथमपुरम येथे आद 11 हजार कामगार परतले आहेत. अशा पद्धतीने विविध राज्यातील कामगारांना आपल्या घरी जाता येत आहे. मात्र त्यांना घरी जाण्यापूर्वी रजिस्ट्रेशन आणि वैद्यकिय चाचणी करुन स्पेशल ट्रेन आणि बसच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. तर दुसरीकडे राजस्थान मधील कोटा येथे अडकलेले विद्यार्थी सुद्धा बसने पुण्यात दाखल झाले आहेत.(Coronavirus: नांदेड मधील गुरुद्वारा लंगर साहिब येथे राहणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, विविध राज्यातील स्थानिक प्रशासन लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी आणि राज्यात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र यावेळी सोशल डिस्टंन्सिंगसह कोरोनासंबंधित नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. काही स्थलांतरित कामगारांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण पायी चालत जात असताना त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.