शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली (Sangli) येथील माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सातारा शहरात जाहिर बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर 17 जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सांगली बंदचे (Sangli Bandh) आवाहन केले होते. त्यानुसार आज सांगली जिल्ह्यात संभाजी भिडे यांनी शिवप्रतिष्ठानच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांनी तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केली तेव्हा संभाजी भिडे गप का होते, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. उदयनराजे भोसले समर्थकांनी तर राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सातारा बंद पुकारले असून गुरूवारी सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प करण्यात आले होते. तसेच साताऱ्यातील मुख्य बाजारपेठाही बंद झाल्या असून वाहतूक व्यवस्थाही तुरळक प्रमाणात सुरू होती. त्यानंतर 17 जानेवारी रोजी संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे अवाहन केले होते. त्यानुसार आज सांगलीत बंद पुकारण्यात आला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत म्हणाल्या की, हा बंद म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ठ करायला शिकवले त्यांच्यासाठी बंद हे चुकीचे आहे. यात काहीतरी राजकीय षडयंत्र आहे, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना असा बंद पुकारणे योग्य वाटत नाही. सध्या राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे, असे मतही सुप्रिया सुळे यांनी वक्त केले. हे देखील वाचा- Sangli Bandh: संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी भिडे यांच्याकडून उद्या सांगली बंदचे आवाहन
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. यात संजय राऊत यांनी मोलाचा वाटा उचलला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रदर्शित झाल्यापासून राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपली आहे. तसेच राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत.