Maharashtra Monsoon Forecast: पुढील 3 तासांत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पावसाची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईसह (Mumbai) उपनगरांमध्ये कालपासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आज पुन्हा एकदा सक्रीय होणार आहे. पुढील 3 तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात ठाणे (Thane), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांच्या अंतर्गत भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेचा (IMD MUMBAI)  अंदाज आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे.

काल मुंबई आणि उपगनरांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर दक्षिण कोकण आणि रायगड मध्ये पावसाने सर्व भाग व्यापला. रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे मागील 24 तासांत मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, आज विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात ढगाळ वातावरण राहणार आहे. (सातारा, परभणीसह राज्याच्या विविध भागांना बसला अवकाळी पावसाचा फटका, शेतपिकांचे प्रचंड नुकसान)

K S Hosalikar Tweet:

12-13 जून रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. रेड अलर्टही घोषित करण्यात आला होता. त्यामुळेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र मुंबईत तितक्या प्रमाणात पाऊस झाला नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी 9-10 तारखेला मुंबईसह कोकणात धुवाधार पाऊस झाला.