आज पासुन महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात झाली आहे. या दोन दिवसीय अधिवेशनासाठी कानाकोपर्यातुन आमदार मुंबईत येत आहेत. याच वाटेत असताना शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांंना मात्र माघारी फिरावे लागले आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ज्यामुळे त्यांंना धरमतर खाडी पुलापर्यंत येउन पुन्हा मागे जावे लागले आहे. याविषयी दळवी यांंनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. आपल्याला कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र खबरदारी म्हणुन आपण घरी क्वारंटाईन राहणार आहोत, डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार या परिस्थितीत काळजी घेणार आहोत असे त्यांंनी ट्विट मध्ये म्हंंटले आहे तसेच आपल्या संपर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण; घरामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडले आहे, आजपासून दोन दिवस घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेत या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यावरुनच काही वेळापुर्वी आमदारांंना विधीमंंडळात प्रवेश देण्यावरुन गोंंधळ झाला होता.
महेंद्र दळवी ट्विट
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी व काळजी घ्यावी.
— Mahendra Dalvi (@MahendraD8100) September 7, 2020
दरम्यान, पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात जाताना आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. सध्या केवळ कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जात आहे. तसेच कोमॉर्बिडीटी (अन्यही आजार असणार्या) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.