राजू शेट्टी (Photo Credit : You tube)

कोल्हापूर जिल्ह्यातील माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याची माहिती समोर येत आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण असून ते घरातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटूंबातील अन्य सदस्यांची आज कोरोनाची चाचणी घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. राजू शेट्टी यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.त्यांनी स्वत: होम क्वारंटाईन करुन घेतल्यामुळे घरातच ते उपचार घेत आहेत.

या जिल्ह्यात यापूर्वी खासदार संजय मंडलिक , आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील आणि प्रकाश आवडे यांच्याबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अनेक अधिका-यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. Coronavirus Update: कोरोना रुग्णसंख्या 9 लाखाच्या पार; महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणुन घ्या

दरम्यान मागील महिन्यात रयत क्रांतीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना कोरोनाची लागण झाली होती. खोत यांनी स्वत: याबाबत फेसबुकवरून माहिती दिली होती.

महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात आजवरची सर्वाधिक म्हणजेच 23,350 इतक्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद (Coronavirus Cases In Maharashtra) झाली ज्यानुसार राज्यातील कोरोना रुग्णांंचा एकुण आकडा 9 लाखाच्या पार गेला आहे. सद्य घडीला पाहायला गेल्यास आजवर राज्यात एकुण 9 लाख 7 हजार 212 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यापैकी कालच्या दिवसात झालेले 328 मृत्यु धरुन 26, 604 जणांंचा कोरोनामुळे बळी (Coronavirus Deaths)  गेला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, एकुण संख्येतील 6,44,400 जणांंनी आजपर्यंत कोरोनावर मात (COVID 19 Recovered Cases) केली आहे. यातील 7,826 जणांना तर मागील 24 तासात डिस्चार्ज मिळाला आहे.