विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील. आज कोणी पावसात कितीही भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही. पुढच्या तीन ते चार तासांमध्येच सर्व चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. महाविकासआघाडीमध्ये काहीतरी गोंधळ उडाला आहे. त्यामुळेच ते वारंवार बैठका घेत आहेत. अपक्ष हे भाजपच्याच बाजूने राहतील. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्षांची कितीतरी वेळा अब्रु घालवली आहे. त्यामुळे अपक्षांची नाराजी मतदानातून निश्चितरित्या उमटली जाईल, असेही पडळकर यांनी म्हटले.
ट्विट