विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ 2020 निवडणूकीत (Maharashtra MLC Election 2020 Results) भाजपला महाविकासआघाडीकडून जोरदार दणका बसला. धुळे-नंदुरबार (Dhule-Nandurbar) सोडले तर नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आणि औरंगाबाद (Aurangabad) येथील जागांवर महाविकासआघाडीचे उमेदवार निवडून आले. या विजयाने महाविकासआघाडीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून भाजपमध्ये मात्र शांतता पसरली आहे. हा धक्का न पचवण्यासारखा असला तरीही भाजप नेत्यांनी मात्र महाविकासआघाडीला लक्ष्य यातील 3 पक्षांवर सडकून टिका केली आहे. भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी "सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय जास्त वेळ टिकत नाही" अशा शब्दांत महाविकासआघाडीवर टिका केली आहे.
तीन पक्ष एकत्र येऊन दोन तीन सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांबाबत अपशब्द वापरत एक ट्विट केले आहे.
३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही. ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 4, 2020
तीन पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार आहात. तुमच्या प्रमुख नेत्याला तुमचा सहकारी पक्ष किंमत देत नही म्हणजे सत्तेसाठी तुम्ही तुमच्या नेत्याची किंमत करत नाही असा अर्थ होतो. https://t.co/5U9siCfOxc
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 4, 2020
तर अन्य एका ट्विटमध्ये निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टिका केली आहे. काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार आहात. तुमच्या प्रमुख नेत्याला तुमचा सहकारी पक्ष किंमत देत नही म्हणजे सत्तेसाठी तुम्ही तुमच्या नेत्याची किंमत करत नाही असे म्हणत शरद पवारांवर टिकास्त्र सोडले आहे.