शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी, बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि 39 आमदारांच्या पक्षप्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच येत्या सहा महिन्यांत राज्यात मध्यवर्ती निवडणुकांचे भाकीत वर्तवले आहे. सिंदे आणि त्यांच्या गटाला अप्रामाणिक लोकांचा जमाव असल्याचे सांगून राऊत म्हणाले, ‘जे एकदा बेईमान झाले ते कायमचे अप्रामाणिक असतात. शिंदे गटातील सदस्यांना पुन्हा प्रामाणिक आणि सच्च्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबात घ्यायचे नाही.’
ते म्हणाले, ‘पुढील सहा महिन्यांत राज्यात मध्यावधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण पुढे सरकणार आहे. सर्वोच्च न्यायालयात कितीही उशीर झाला तरी जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा लागेल.’ राऊत यांनी अंदाज वर्तवले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आताचे सरकार कोसळेल व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यानंतर राज्यात मध्यावधी विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील.
येत्या सहा महिन्यांत राज्य विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका नक्कीच होतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. राऊत म्हणाले, ‘आम्ही आशेवर जगणारे लोक नाही. आम्हाला आता पुन्हा एकदा आमच्या कामगिरीवर जोर द्यायचा आहे. आमचा पहिला विजय अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत झाला. भाजपने उमेदवारी मागे घेण्याची आम्ही कधीही मागणी केली नाही.’ (हेही वाचा: खासदार-आमदारांवरील वाढत्या खटल्यांबाबत महाराष्ट्र देशात अव्वल; 16 उच्च न्यायालयांकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे निष्कर्ष)
ते म्हणाले, ‘शेवटचा विश्वासघात (पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश) दोन दिवसांपूर्वी झाला. आम्हाला ते अपेक्षितच होते. त्यांनी (शिंदे आणि इतर बंडखोरांनी) पक्षाच्या अस्तित्वात बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी कितीही विश्वासघात केला तरी त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत.’ महाविकास आघाडीतील 13 ते 14 आमदार शिंदे गट आणि भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना, स्वप्न पहातच बसावी त्यांनी.