Photo Credit- X

Maharashtra Lottery Results: महाराष्ट्रलक्ष्मी ( Maharashtra Lakshmi), महा.गजलक्ष्मी शनि (Maha Gajalakshmi Shani), गणेशलक्ष्मी समृद्धी (Ganeshlakshmi Gaurav), महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी (Maha Sahyadri Draupalaxmi) लॉटरींची सोडत आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. अशा रितीने सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह असतात. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.

लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग सरकार राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये महाराष्ट्रलक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा.गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.