Maharashtra Lockdown: तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू शकतात, सरकारकडून केला जातोय विचार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

Maharashtra Lockdown: कोरोनाच्या रुग्णांचा आकडा काही काळापर्यंत कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. परंतु आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करता गणेश चतुर्थी सारख्या सणांनंतर रुग्णांच्या आकड्यात वाढ होण्याचा अंदाज लावला जात हे. यासाठीच आता महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे.(Covid-19 Vaccination in Mumbai: कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यासाठी उद्या मुंबईतील केंद्रांवर विशेष सत्राचे आयोजन)

रिपोर्ट्सनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लावू शकते. असे मानले जात आहे की, आमागी सण लक्षात घेता संचारबंदी किंवा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर सुद्धा गाइडलाइन्स तयार करु शकते.

मंत्री अस्लम शेख यांनी असे म्हटले की, कोरोनाच्या रुग्ण संख्येत जर वाढ झाल्यास सप्टेंबरच्या अखेर पर्यंत पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात. कोविड19 टास्क फोर्सनुसार सप्टेंबरच्या अखेर पर्यंत रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. यासाठीच नियम लागू करण्याची आवश्यकता भासू शकते. मात्र जर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे कठोर पणे पालन केल्यास रुग्णांचा आकडा वाढणार नाही.

एका अभ्यासासानुसार, महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुणे येथे बसू शकतो. आरोग्य विभागाने म्हटले की, तिसऱ्या लाटेच्या दरम्यान, 60 लाखांहून अधिक प्रकरणे समोर येऊ शकतात. यामधील बहुतांश प्रकरणे ही मुंबई आणि पुण्यातील असतील. राजेश टोपे यांनी म्हटले की, पहिल्या लाटेच्या वेळी 20 लाख, दुसऱ्या लाटेच्या वेळी 40 लाख लोकांना फटका बसला आहे. तर तिसऱ्या लाटेत 60 लाखांहून अधिक प्रकरणे समोर येऊ शकतात.(Ganeshotsav 2021: कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमात मुभा द्या अन्यथा 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा)

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे आणखी 4342 रुग्ण आढळले असून 55 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत 4755 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. पुण्यात 17 जणांना बळी गेला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 50,607 वर पोहचला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा ठिक होण्याचा दर हा 97.04 टक्के तर मृत्यू दर 2.12 टक्के आहे. मुंबई शहरात 440 नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.