Maharashtra Lockdown May Extend: महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपायला अवघे 9 दिवस उरले; राज्यात 1 जूननंतर काय होणार? वाचा सविस्तर
Lockdown | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील कोरोबाधित रुग्णांची संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, राज्यात आता म्युकरमायकोसिस यात संकटाने डोके वर काढले आहे. याचबरोबर राज्यात कोरोना लशींचा तुडवडा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, 1 जूननंतर निर्बंध हळूहळू शिथील होतील की नाही? याबाबतही संभ्रमता आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन संदर्भातही भाष्य केले. म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अटोक्यात आली आहे. मात्र, पहिल्या लाटेच्या वेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यानंतर कोरोना चौपटीने वाढला. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनचे काय परिणाम होतात? हे पाहिल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सध्याची परिस्थिती बघून लवकरच आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन निर्बंध शिथील करायचे की नाही यावर निर्णय घेता येणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. हे देखील वाचा- Hasan Mushrif: देवेंद्र फडणवीस यांना गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवावे, महाराष्ट्रात त्यांची आवश्यकता नाही- हसन मुश्रीफ

महाराष्ट्रात काल (21 मे) 29 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 47 हजार 371 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 50 लाख 26 हजार 308 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3 लाख 83 हजार253 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.43% झाले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसेच महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 04 लाख 99 हजार 346 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.20 मे 2021 रोजी 1 लाख 56 हजार 491 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.