Tukaram Munde (Photo Credit: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु राज्य सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठी मार्गदर्शक सुचना नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून तेथे लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याच दरम्यान, आता नागपूर प्रशासनाने येत्या 17 पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यावेळी सुद्धा फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी असे म्हटले आहे की, नागपूर मध्ये येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहे. तर कंन्टेंटमेंट झोन व्यतिरिक्त अन्य 33 टक्के ऑफिसे बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. तर नागपूर मधील सतरंजीपूरात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र अजून 500 संशयित कोरोनाग्रस्तांचा शोध घेतला जात असून त्यांना ही क्वारंटाइन करण्यात येणार आहे.(नागपूर येथून सुटलेल्या 'श्रमिक स्पेशल ट्रेन' मधील प्रवाशांच्या तिकीटासाठी नितीन राऊत यांची 5 लाखाची मदत; कामगारांचे प्रवास भाडे केंद्र सरकारने देण्याचे आवाहन)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने नवी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली आहे. तसेच देशात येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.मात्र आजपासून काही ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथिल करुन अंशत: गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. पण यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ही सुचना देण्यात आले आहे.