Maharashtra Legislative Council Election Results: विधमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेतील (Vidhan Parishad Election) रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (1 जुलै) पार पडत आहे. या निवडणुकीत मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई (Mumbai News) शिक्षक आणि नाशिक शिक्षक (Teachers And Graduates Election) या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान झाले. आज सकाळी 8 वाजलेपासून या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. निवडणूक अतितटीची आहे. त्यामुळे दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.
प्रमुख लढती आणि उमेदवार
मुंबई पदवीधर मतदारसंघ: शिवसेना (UBT) पक्षाचे अनिल परब (Anil Parab) आणि भाजपचे किरण शेलार (Kiran Shelar) यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ: भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेस उमेदवार रमेश किर यांच्यात सामना होणार आहे.
दरम्यान, महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यातर्फे मैदानात उतलेल्या अनुक्रमे संदिप गुळवे, किशोर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याही राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरे यांच्या मनसेची माघार)
मुंबई शिक्षक मतदारसंघातील एकूण उमेदवार आणि त्यांची नावे
ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट
शिवनाथ दराडे : भाजप
सुभाष मोरे : शिक्षक भारती
शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. मुंबई, नाशिक, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तर महापालिका निवडणुकाच न झाल्याने लोकप्रतिनिधीच नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. इतकेच नव्हे तर या निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडूण जाणाऱ्या उमेदवारांचीही निवडणूक झाली नाही. परिणामी विधान परिषदेतील सदस्यांची संख्या कधी नव्हे ती इतकी कमी झाली आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे गळपाटलेल्या सत्ताधारी गटाला ही निवडणूक जिंकून जनमत अजूनही आपल्या बाजूने असल्याचे दाखवायचे आहे. तर दुसऱ्या बाजूला फाटाफुटीमुळे गलीतगात्र झालेल्या विरोधकांना खास करुन शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) या पक्षांना विधमंडळातील आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातच शिवसेना (UBT) पक्षाने अनिल परब यांच्यासारख्या मुत्सद्दी नेत्यास उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजूस भाजपचे निरंजन डावखरे हे देखील मैदानात आहेत. परिणामी सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा जोरदार सामना रंगल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले.