विधान परिषद निवडणूक 2020: पंकजा मुंडे यांच्यासारखा अभ्यास माझ्यासह इतरांना जमला नाही; भाजप नेते राम शिंदे यांची खोचक प्रतिक्रिया
Ram Shinde | (Photo Credits: YouTube Screenshot)

Maharashtra Legislative Council Election 2020: विधान परिषद निवडणूक 2020 च्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात मोठी नाराजी आहे. प्रामुख्याने ही नाराजी ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरु आहे. यात एकनाथ खडसे (Eknath Khadse), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्ये आता माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांचाही समावेश झाला आहे. विधन परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या उमेदवारीबाबत एक खोचक प्रतिक्रिया देत राम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहत. या भावना व्यक्त करताना 'पंकजा मुंडे यांच्यासारखा अभ्यास माझ्यासह इतरांना जमला नाही' असे शिदे यांनी म्हटले आहे.

राम शिंदे यांनी आपल्या @RamShindeMLA या ट्विर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिंदे यांनी म्हटले आहे की, 'विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी नेते, इच्छूक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील. असे म्हटले होते. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो मला आणि इतरांना जमला नाही', असे म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी प्रविण दटके , गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावे जाहीर केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत लातूरचे रमेश कराड (Ramesh Karad) यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला. तसेच, कराड यांची उमेदवारी जाहीर केली.विधान परिषद निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांना धक्का देत चार नवे चेहरे रिंगणात उतरवले. त्यामुळे एकनाथ खडसे,पंकजा मुंडे , विनोद तावडे , चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या जेष्ठ भाजप नेत्यांमध्ये मोठी नाराजी होती. ही नाराजी केवळ नेत्यांमध्येच नव्हती तर कार्यकर्त्यांमध्येही होती. या नाराजीचे रुपांत मोठ्या लाटेत होण्याआधीच पक्षाला काहीतरी निर्णय घेणे महत्त्वाचे होते. त्यामुळेच भाजपने ऐनवेळी निर्णय बदलल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (हेही वाचा,विधान परिषद निवडणूक 2020: कोण आहेत रमेश कराड? भाजपने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी का दिली? )

राम शिंदे ट्विट

दरम्यान, आता केवळ एकनाथ खडसे,पंकजा मुंडे , विनोद तावडे , चंद्रशेखर बावनकुळे आदी नेतेच नव्हे तर, भाजपमधील इतरही जेष्ठ नेते नाराज असल्याचे पुढे येत आहे. नव्यांना संधी देऊन त्यांचे पक्षातील स्थान बळकट करत असताना भाजप जुन्या जाणत्या नेत्यांची नाराजी कशी दूर करतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.