Ramesh Karad | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Legislative Council Election: विधान परिषद निवडणूक 2020 मध्ये महाराष्ट्र भाजपने आपला चौथा उमेदवार अचानक बदलला आहे. त्यामुळे डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा अर्ज मागे घेतल्याने. आता लातूरचे रमेश कराड (Ramesh Karad) हे उमेदवार असणार आहेत. पक्षातील ज्येष्ठांना धक्काद देत भाजपच्या केंद्रीय समितीने प्रविण दटके (Pravin Datke), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अजित गोपछडे (Ajit Gopchade) आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांची नावे जाहीर केली. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासारख्या जेष्ठ भाजप नेत्यांमध्ये मोठी नाराजी होती. अखेर अखेरच्या क्षणी पक्षातील नाराजी आणि पक्षांतर्गत टीका विचारात घेत भाजपने डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत विधान परिषदेसाठी रमेश कराड यांच्या नावाची घोषणा केली, अशा अशयाचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

रमेश कराड यांनी सोमवारी (11 मे 2020) या दिवशी मुंबईला जाऊन आपला उमेदवारी अर्ज अचानक भरला. हा अर्ज भरताना त्यांच्यासोबत नेते प्रवीण दरेकर, अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगितले जात आहे. भाजपडून कराड यांचा अर्ज दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, सुरुवातील कराड यांचा अर्ज डमी अर्ज म्हणून भरल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता कराड यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करत भाजपने कराड हे डमी नव्हे तर ओरिजनल उमेदवार असतील, असे स्पष्ट केले आहे. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Election 2020: भाजप उमेदवार प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय कारकीर्द)

रमेश कराड हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि गोपीनाथ मुंडे गाटाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. लातूर ग्रामीणमध्ये कराड यांचे पक्षीय संघटन मजबूत आहे. गेली अनेक वर्षे ते भाजपसोबत काम करत आहेत. त्यांना आमदार होण्याची महात्त्वाकांक्षा आहे. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि त्यांचे आमदार होणे मागे पडत गेले. मधल्या काळात कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जवळीक वाढवत विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जही दाखल केला होता. दरम्यान, पुन्हा काही अडचणी निर्माण झाल्या. कराड यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. दरम्यान, कराड यांना भाजपने अखेर उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे कराड यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.