Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

Rain Alert in Maharashtra: राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळधार पडतो आहे. खास करुन कोकण आणि घाटमाथा विभागांमध्ये पुढचे पाच दिवस वरुणराजा अधिक सक्रीय असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभाग द्वारा देण्यात आली आहे. या काळात राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेतो, असेही आयएमडीने (IMD) म्हटले आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी (19 जुलै) सकाळी 8.30 ते शनिवारी (20 जुलै) सकाळी 8.30 या कालावधीत 203.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसाची नोंद तांत्रिकदृष्ट्या 04.05 मिमी पेक्षा अधिक अशी केली जाते. तसेच हा पाऊस अतिवृष्टी निकषात मोडतो. ज्याच्या जवळ मुंबईतील पाऊस जवळपास पोहोचला होता.

दक्षिण कोकणात दमदार, उत्तर कोकणात काहीसा धिमा पाऊस

हवामान विभागाने म्हटले आहे की, दक्षिण कोकण विभागात पावसाची शक्यता कायम असल्याने त्या ठिकाणी दिलेला ऑरेंज अलर्ट कायम आहे. तर उत्तर कोकणात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहील. दरम्यान, पालघर आणि ठाण्यात मात्र पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्याने त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आाहे. (हेही वाचा, Irshalwadi Landslide: मृतांची संख्या 22 वर , NDRF ची शोधमोहीम सुरुच)

मराठवाड्यात मुसळधार पाऊस

मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागात पुढचे 48 तास अधिक महत्त्वाचे आहेत. घाट माधा परिसरातील पुणे जिल्ह्यातही मुसळधार ते तीव्र स्वरुपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते. शिवाय कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये येत्या बुधवारपर्यंत पावसाची स्थिती कायम आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

इर्शाळवाडी येथील घटा धक्कादायक

राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने नैसर्गिक आपत्तीसुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात ईर्शाळवाडी गावात भूस्खलनाची घटना घडली. संपूर्ण गाव मितीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेमुळे अनेकांचे प्राण गेले. अनेकांचे संसार मातीमोल झाले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. NDRF तुकडीकडून शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, ईर्शाळवाडी गावातील दुर्घटनाग्रस्तांतील मृतांच्या कटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.