भारतात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गदड होत असताना दिसत आहे. तर, दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीची लगबगही सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात झाली. बिहारपासून या अभियानाला प्रारंभ झाला. यावेळी मोदी यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधताना गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांचे स्मरण केले होते. यावरून राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच “बाय द वे, बिहार निवडणुका याचवर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. निवेदन संपले. धन्यावाद”, असा टोला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात काम करणारे लाखो मजूर आपल्या मूळ गावी परतले आहेत. या मजुरांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांच्या गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात बिहारमधून करण्यात आली आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात संघर्षात होऊन शहीद झालेल्या बिहारमधील जवानांचे स्मरण केले होते. त्याचबरोबर लडाखमधील पराक्रम बिहार रेजिमेंट केला आहे. प्रत्येक बिहारी व्यक्तीला याचा अभिमान वाटायला हवा, असेही मोदी म्हणाले होते. हे देखील वाचा- India-China Face-Off in Ladakh: देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन झाले नाही तर 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? पंतप्रधान मोदी यांच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-
बाय द वे , बिहार निवडणुका याचवर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.
निवेदन संपले धन्यवाद💐 pic.twitter.com/GSwchrnfz6
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 21, 2020
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटवर भाजपच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, बिहार निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे या अभियानाची सुरुवात बिहार राज्यातून करण्यात आली आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.